टाकून जा..

तुझ्या जाण्यानं तसा,

काही फ़रक नाही पडला.....

आठवणींचं ओझं माझ्याजवळ राहीलंय,

ते मात्र घेउन जा.....

माझं जीवन आहे तस्सं आहे,

जाता जाता श्वास.....

तुझ्याजवळच राहीला,

तो मात्र परत करुन जा.....

चुका माझ्या हातून खूपच झाल्या,

त्याचं माप माझ्या पदरात,

आतातरी टाकून जा.....

बोलू नकोस हवंतर माझ्याशी एकदाही,

तुझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावून बसलोय.....

एकदातरी कटाक्ष टाकून जा.....

एकदातरी कटाक्ष टाकून जा.....

Previous Post Next Post