जाणवून बघ..

माझी आठवण आली कधी, तर पापण्या जरा मीटून बघ, आपल्या सरलेल्या क्षणांमधले, संवाद जरा आठवून बघ.....

माझी आठवण आली कधी, तर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ, त्या पाऊल वाटेवरती, उमटलेलीआपलीपाऊले बघ.....

माझी आठवण आली कधी, तर उडणा-यापक्षांकडे बघ, त्यांच्यासारखाचं माझं मन, तूझ्याकडे धावत आलेलं बघ.....

माझी आठवण आली कधी, तर चांदण्याजरा मोजून बघ, चांदण्या रात्री घेतलेल्या शपथेचा, शब्द न शब्द आठवून बघ.....

माझी आठवण आली कधी, तर समुद्रकिनारीजाऊन बघ, हजारदा किना-याला मिठीत घेऊन सुद्धा, परतणाऱ्या निराश लाटेचं विव्हळणं बघ.....

माझी आठवण आली कधी, तर एकदा साद मला घालून बघ, तुझ्या अवतीभोवती फिरणारं, माझं अस्तित्व जरा जाणवून बघ.....

माझं अस्तित्व जरा जाणवून बघ....

जाणवून बघ.. जाणवून बघ.. Reviewed by Hanumant Nalwade on July 20, 2013 Rating: 5
Powered by Blogger.