Tuesday, July 23, 2013

तर तू आहेस

फक्त एक दिवस तू माझे ह्रिदय होऊन बघ,प्रत्येक स्पंदनात तू आहेस! फक्त एक दिवस तू अंतर्मनात माझ्याझाकून बघ,प्रत्येक भावनेत तू आहेस! फक्त एक दिवस तू माझ्या खळाल्ण्यार्या हास्याची लकेर होऊन बघ,खुलणारी खळी तू आहेस! फक्त एक दिवस तू माझ्या मिटल्या पापण्यात राहून बघ,प्रत्येक स्वप्नात तू आहेस! फक्त एक दिवस तू माझ्या नजरेचा किनारा होऊन बघ,प्रत्येक दिशेला तू आहेस! फक्त एक दिवस तू माझ्या विचारांचाताबा घे,संपूर्ण विचारच तू आहेस! फक्त एक दिवस तू माझी लेखणी होऊन बघ,तिच्या प्रत्येक शब्दात तू आहेस! फक्त एक दिवसतरी मला माझी होऊन दे,,माझ्यात तर सतत तूचआहेस! ,,,एक दिवस तू तुझा मला देऊन बघ,,माझे जीवनच तर तू आहेस!

Reactions: