तुझी एकच आठवण पुरते.

पहिलापाऊस आणि पहिले प्रेम पहिलापाऊस पहिले प्रेम , पहिल्या सरीचे पहिले थेंब .. मुसळधार धारा आणि कोसळणारा पाऊस .. त्यात भिजण्याची त्याची हौस ... (तिला पाऊस आवडत नाही .. पण त्याला पाऊस आवडतो..तीचे आणि त्याचे संभाषण खाली) पाऊस म्हणजे चिखल , पाऊस म्हणजे ओली माती. सखे ह्या पावसातच जुळतात जन्मा-जन्माच्यागाठी , पाऊस म्हणजे वाफाळलेला चहा , पाऊसम्हणजे गरम कांदा भजी... राणी ह्यांच्या प्रमाणेच असुदे प्रीत तुझी अन माझी... पाऊस म्हणजे थंडगार वारा , पाऊस म्हणजे सर्दी .. पाऊस म्हणजे प्रेमाच्या धारा , पाऊस म्हणजे प्रेमाची वर्दी .. (ती चिडते आणि म्हणते ) माझ्या आणि पावसा मध्ये कोणाला पसंत करशील , सखे वाटलं नव्हत ,अस विचारून माझ्या हृदयाची शकल करशील .. मला तर पाऊसच प्रिय वाटतो .. आणित्याच्या थेंबा मधून तुझाचचेहरा वाहतो .. कापसाच्या पिंजर्यातला काळाकुट ढग .. तुझ्या गोऱ्या गालावरची जणू केसांची बट.. पावसानी भरलेले नभ ओले ओले , माझ्याच प्रतीबिम्बात बुडलेले तुझे निळेशार डोळे .कुठूनशीयेणारी कडाडणारीवीज , पण तुझ्या स्मित हास्याचे तिला नाही चीज . म्हणूनच म्हणतो , तुझ्या पेक्षा पाऊस मला प्रिय वाटतो , आणित्याला पाहिल्यावर मला तुझाचचेहरा स्मरतो .. चल सोडून सारी लाज , दुनियेचाराखू नको बाज , कशाला काम आणि कशाला काज .. चल पावसात बेभान नाचूया आज .. नको .. मला पावसाची भीती वाटते . .कडाडणारी वीज किती खरी वाटते .. चल भिवू नको...बाहेर मी पावसालाच भिजताना पाहिलाय .. आपल्या सारखीच तोही छत्री विसरलाय .... म्हणूनच पाऊस मलातुझ्याहून प्रिय वाटतो .. त्याला पाहिल्यावर , त्यात मला तुझाच चेहरा स्मरतो... चल मनातल्या मनात माझ्या , आठवणीच्या गावी जावू .. आणितुझे माझे सारेच पावसाळे परत भिजून पाहू... पाऊस आल्यावर एखादी अशी कविता स्मरते .. आणिजगण्याला तुझी एकच आठवण पुरते..

Previous Post Next Post