फक्त तुलाच पाहत बसाव... तुझ्यातच माझ विश्व शोधाव, अन शोधता शोधता,तुझ्यातच हरवून जाव... तू बोलत असलीस कि अस वाटत, तू फक्त बोलतचरहाव, अन मी फक्त ऐकतच रहाव, आपल हे बोलन, कधी हि न संपाव... तू उदास झालीस कि अस वाटत, तुला हसवण्यासाठी मी काहीही कराव... बागेत तुझ्या बरोबर फिरताना, फक्त तुला हसवण्यासाठी, मीमुद्दामूनच धडपडाव... अन लागलं म्हणून, मीखोट खोट तुझ्या पुढे रडाव ... मग माझा खोटेपणा कळताच, तू माझ्यावर मुद्दामून रुसाव, मीतुला मन्वण्याचा प्रयत्न करताच , गालातल्या गालात तू हळूचहसाव, अन मी घेता तुझा हात माझ्या हातात, तू हलकेच लाजाव... तू हसू लागलीस कि अस वाटत, एखाद गुलाबच फुल फुलाव, पाहून तुला हसताना, मीहि खूप खूप हसाव... तू बरोबर असलीस कि अस वाटत, दिवस संपूच नये कधी, अन आपण बरोबरच रहाव, फक्त तू अन मी, अजून कोणीच नसाव... अजून कोणीच नसाव...
अजून कोणीच नसाव.
Hanumant Nalwade
0
Tags
अजून कोणीच नसाव.