एक मैत्रीण माझी.

 होती एक माझी मैत्रीण माझ्या कवितांवर प्रेम करणारी माझ्या शब्दाना समजणारी
 होती एक मैत्रीण माझी मला रोज सकाळी मेसेज करणारी पिल्लू , स्वीटहार्ट, चेतू म्हणून झोपेतून उठवणारी
होती एक मैत्रीण माझी मला समजून घेणारी माझ्या डोळ्यातले दुःख सहजपणे वाचणारी
 होती एक मैत्रीण माझी माझ्यावर हक्काने रुसणारी आणि मी फनी फेसेस केल्यावर माझ्यावर खुदु खुदु हसणारी
 होती एक मैत्रीण माझी माझ्या सोबत निर्धास्त चालणारी बरसणाऱ्या पावसात माझी सोबतीन् बनणारी
 होती एक मैत्रीण माझी गुड्डू न् क्युट दिसणारी आनंद झाल्यावर मला घट्ट मिठीत घेणारी
 होती एक मैत्रीण माझी होती एक मैत्रीण माझी.....
 
एक मैत्रीण माझी. एक मैत्रीण माझी. Reviewed by Hanumant Nalwade on July 07, 2013 Rating: 5
Powered by Blogger.