विसरून जाव म्हटल तुला, पण विसरताचं आलं नाही,
 आज ही तुला आठवल्या शिवाय, पाऊल पुढे जात नाही.....

खुप अपमान केलास, खुप तमाशा केलास,
 नको तेवढं वाईट बोलून, सभ्य पणाचा आव आणलास....

भातुकलीच्या खेळासारखा, खेळ तू खेळलिस,
 आणि, अर्ध्यावरती डाव सोडून, भांडून निघून गेलीस.....

खोट होतं सगळ, खोटे तुझे बहाने,
 खोट्या आना बाका, आणि खोटी होती वचने.....

बघ खरं प्रेम करून कोणावर, कळेल प्रेम काय असत,
 आणि, एखाद्याच्या विरहात, जगणं किती कठिन असत.....

कित्येक रात्री रडून काढल्या, कितेक रात्री उपाशी राहिलो,
 वाटलं सोडून जावं सगळ्यांना, निरोप घ्यावा जगाचा.....

पण कसा बसा सावरलो, निर्धार केला तुला विसरण्याचा,
 पण, कितीही प्रयत्न केले, तरी विसरता आलचं नाही.....

आणि.........

तुझ्या बरोबरच्या गोड क्षणांना, आठवल्या शिवाय माझा कुठलाही,
 दिवस जातचं नाही, दिवस जातचं नाही....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top