तू सुधा रडत असशील.

आठवतं का ग तुला माझ्या आठवणीत ते तुझं रात्रं रात्रं जागून रडणं, आठवतं का ग तुला मला भेटण्याची ती उत्सुकता तुझ्या चेहऱ् दिसत होती आठवतं का ग तुला आपली ती पहिली भेट जेव्हा तू माझ्या मिठीत येऊन रडली होतीस, आठवतं का ग तुला ते आपलं रात्रं रात्रं उशिरा पर्यंत Phone वर गप्पा मारणं आठवतं का ग तुला ते आपल्या भेटण्याचे सुखद क्षण जे कधी न विसरण्यासारखे आहेत, आठवतं का ग तुला ते तुझं ते छोट छोट्या गोष्टींवर्ती माझी चूक नसताना रागावणं आणि माझं तुझं प्रेमाने मनवणं, आठवतं का ग तुला तो दुःखाचा दिवस जेव्हा आपण शेवटचं भेटलो होतो कधीच न भेटण्यासाठी, आठवतं का ग तुला खरंच आठवतं का ग तुला हे सर्व क्षण खूप रडतो ग मनापासून जेव्हा सर्व आठवतं तेव्हा, कदाचित तू सुधा रडत असशील..
तू सुधा रडत असशील. तू सुधा रडत असशील. Reviewed by Hanumant Nalwade on July 01, 2013 Rating: 5
Powered by Blogger.