पुन्हा मी मिळणार नाही...

मागून बघ जीव ही नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी पुन्हा मी मिळणार नाही...
तुझा झालो तेव्हाच मी माझ्यासाठी संपलो होतो,
प्रत्येक क्षण तुझ्यासाठी, तुझ्या बरोबरच जगलो आहे..
श्वसांच्या प्रत्येक स्पंदणात फक्त तुलाच तर जपले आहे,
मागून घे श्वासही, नाही मी म्हणणार नाही..
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही... तुझे माझे काय असते
कधी मला कळलेच नाही तुझ्या शिवाय जगायचे
स्वप्न ही कधी मला पडले नाही, मागून घे स्वप्नेही,
नाही मी म्हणणार नाही.. नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही... ईतकेच सांगतो तुला ही
माझ्या शिवाय जमणार नाही आणि तुझे ते तरफडणे
मी सहन करणार नाही मागून घे अंतही,
नाही मी म्हणणार नाही.. नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही...
पुन्हा मी मिळणार नाही... पुन्हा मी मिळणार नाही... Reviewed by Hanumant Nalwade on July 01, 2013 Rating: 5
Powered by Blogger.