तुझ्या शिवाय काही सुचत नाही.

येवुन मिठीत आज म्हणाली  तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तूच हवास जवळ सारखा....... मनाला दुसरं काही रुचत नाही

सांग ना रे हल्ली असं का होतय मन सारखं तुझ्याकडे झेप घेतय
नाही ते आज था-यावर...... सारखं हिंडतय बघ वा-यावर

खरचं मला तुझी लागली ओढ का नाही लागणार तू आहेसच गोड
चल ना रे कुठेतरी दूर जाऊ....... काही क्षण का होईना सहवासात राहू

अरे असा लगेच रागावतोस काय ऐकना रे,तुझ्या शिवाय करमतच न्हाय
सांग ना कधी नेतोस घरी....... माप ओलांडायचय मला येवून दारी...

चल ना लवकर ने ना रे मला तुझ्या शिवाय काही सुचत नाही
किती त्रास देशील मनाला....... मनाला दुसरं काही रुचत नाही
तुझ्या शिवाय काही सुचत नाही. तुझ्या शिवाय काही सुचत नाही. Reviewed by Hanumant Nalwade on July 01, 2013 Rating: 5
Powered by Blogger.