कुणीच नाही ...!!

तुझ्या सारखे कुणीच नाही...!!
गर्दीत सोडणारे आहेत इथे
पण ....??
त्यात हात पकडणारा कुणीच नाही
हरवशील सांगत सोबत चल म्हणणारे कुणीच नाही...
हो खरच तू म्हणत होती मी खूप साधा आहे
मला ओळखणारे कुणीच नाही...
तू होतीस आहेस म्हणून मी जगतो आहे
आपले म्हणणारे इथे माझे कुणीच नव्हते
तुझ्या सारखे कुणीच नव्हते..!!
रोज दिवस येतो पण रात्र होताना
तुझी आठवण जातच नाही...
एवढे प्रेम दिलास मला
तुझ्यावीण सखे राहवतच नाही...
खरंच शोना तुझ्या सारखे कुणीच नाही ...!!
कुणीच नाही ...!! कुणीच नाही ...!! Reviewed by Hanumant Nalwade on June 26, 2013 Rating: 5
Powered by Blogger.