जीवनात ये ग राणी ना मन तळ्यात रमत
न रमत मळ्यात जीव माझा सखे अडकला
तुझ्या काळ्याभोर डोळ्यात


कधी मुकाट वाहत्या नदीत कधी उनाड ओढ्यात
दिससी राणी तू मला आकाशाच्या ग निळ्यात

मळयामंधी माझ्या बहरली शेकडोनी फुले
वारा खोड काढीता ग त्यांची मन माझे फुलासंगे डोले

मळयामंधी प्रत्येक फुलात राणी चेहरा तुझा ग दिसतो
भान मग राहत कोणाला आणि पाय चिखलात फसतो

गाईलाही मी आता कशी आहे विचारितो
हातून चाबूक गळाला बैलांना मी गोंजारीतो

काल बाजारात तुला परत पाहिली भाळी शोभे चंद्रकोरी टिकली
काल कपाळावरून सटकली निघाली तिथून सरळ काळजाला चिकटली

तुझ्यामुळे प्रिये आता प्रत्येक ऋतू ग हिरवा
तूच नवसाने झालेला पाऊस तूच शेतातला गारवा

जवळ ये ग तू आता नको राहू दूर दूर
जवळ नसलीस तेंव्हा उरी आठवणींचे काहूर

शेतात पिकवेल हिरे मोती येवढा मनगटी माझ्या जोर
एकदा जीवनात ये ग राणी कर जगणं हे थोर ..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top