खोटे ते वचन खोटा तो सहवास .

वेदनेच्या सरी पडता उरी ...
हरवलो अनंतात शिरल्या अंतरी ..
तुटले स्वप्न पाणावले डोळे ....
विरहात भिजले मनहि वेडे ...
खोटे ते वचन खोटा तो सहवास ..
गेली तू केव्हाच उरला आभास ...
स्पर्श तुझा आठवता शहारते अंग ..
तुजवाचून जीवन वाटे .. बेरंग ...
आठवणीत तुझ्या आहे मी मग्न ...
व्यर्थ मज वाटे तुजवाचून जगणं ....

का रे छळतो माझ्या परक्या मना ...
खोटे ते वचन खोटा तो सहवास . खोटे ते वचन खोटा तो सहवास . Reviewed by Hanumant Nalwade on April 06, 2013 Rating: 5
Powered by Blogger.