"कदाचित तुला माझी आठवण येईल !".......
पिउनिया पाणी पावसाचे
भूमीत नवअंकुरे फुटतील
रंग त्यांचा कांचन-पिवळा
क्षणैक त्यांस निरखून बघ
नाजूक त्यांचे रूप पाहताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !
पावसात तू एकटा चालताना
सरींसोबत वाराही सतावेल
तीही अशीच खट्याळ होती
छत्री उडताना तुझ जाणवेल
पाठलाग तिचा करताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !
वाऱ्यामुळे थरथरणारे पर्ण
विसावेल येऊनी खांद्यावरी
थरथरणाऱ्या पापण्यांसवे
निजली होती ती याचपरी
पर्णास त्या स्पर्शताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !
चिंब भिजता हात शेकुनी
ऊब देशील तव गालांना
जाणवेल ती समीप असता
हात कधी न गारठला तुझा
हळूच तेव्हा मूठ वळताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !
आजही तो मोसम बघ
धुंद मस्त होऊन येतो
पण तू मात्र आज मला
केवळ आठवांतच भेटतो
प्रेमाचा हा मोसम जगताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !