खरंच मनाला दार असतं तर,
साऱ्या जगाला बाहेरच ठेवलं असतं...
कुणाची काय मर्जी आहे,
ते पाहिल्यावर त्याला आत सोडलं असतं...
खरंच मनाला दार असतं तर,
तुझी स्वप्न बाहेरच ठेवली असती...
नुसतीच आशा ठेवन्यापेक्षा ती
पूर्ण झाल्यावरच त्यांना मनात जागा दिली असती...
खरंच मनाला दार असतं तर,
तुझ्या आठवणी बाहेरच ठेवल्या असत्या...
तुझ्या विचाराने येणाऱ्या अश्रूंना
मनात जागा दिल्या असत्या...
खरंच मनाला दार असतं तर,
तुझे विचारही बाहेरच ठेवले असते...
तुझ्या विचाराने मरन्यापेक्षा
मन रिकामे ठेवणे पसंत केले असते...
खरंच मनाला दार असतं तर,
शब्द मात्र या वेळी आतच ठेवले असते...
असे कवितेत लिहिण्यापेक्षा
कायमचे मनात कोरुन ठेवले असते...
खरंच मनाला दार असतं तर

गूगल ऐडवर्ड्स

 
Top