डोळे बंद असताना.

आज श्वासालाही उघाण आलं तिला मिटीत घेताना,
चुकत होते ठोके काळजाचे तिला मिठीत घेताना,
तिचा श्वासही थांबला आज त्या भेटीच्या वाद्ळांत,
जराही नाही लवल्या पापण्या तिला डोळ्यात भरताना...

आज मनालाही उधाण आलं तिचा हात मुठीत धरताना,
थरथरत होते काळीज तिचे कुशीत माझ्या शिरताना,
हलकी लहर जरी आली तरी तो वादळांचा भास होता,
आज काळजातही चमकल्या विजा तिला जवळ घेताना...

मग डोळ्यांनाही उधाण आलं ओठ तिचे पाहताना,
मग मान वळवली तिने एका श्वासाचं अतंर असताना,
कापत होते ओठ तिचे पून्हां मागे वळून पाहताना,
मग ओठांनीच ओठांना शातं केल डोळे बंद असताना...
Previous Post Next Post