तू नाराज होवू नकोस रे.

माझ्यावर फक्त तू नाराज होवू नकोस रे .....
रुसून बस माझ्यासाठी पण
फक्त तू नाराज होवू नकोस रे......
कितीही रडव मला.,माझ्याशी कितीही भांड
पण तू नाराज नको होवूस रे....
जेंव्हा कधी असं होईल...
माझी आठवण तुला घडी घडी येईल...
माझी साथ तुला सतावत राहील...
माझा स्पर्श तुला हवाहवासा वाटेल...
काळजी करू नकोस...
स्वप्नान मध्ये मीच येईल तुझ्या...
देईन माझ अस्तित्व दाखवूनतुला...
घेईन तुझा हात माझ्या हाती...
पण फक्त तू नाराज होवू नकोस रे...
रुसून बसेल कारण नसताना मग मीही तुझ्यासाठी...
रडलास तर माझे हात असतील...
त्या आसवांना पुसण्यासाठी...
नाही मी सत्यात तुझ्यासोबत....
पण आहे तुझ्याच स्वप्नात तुझ्यासाठी...
पण फक्त तू नाराज होवू नकोस रे...
Share on Google Plus

About Hanumant Nalwade