आज वाटेत चालतांना जरा एकटेपणा जाणावला,
फ़ार काही नाही डोळ्यांचा काठ तेवढा पाणवला,
वाटेवर होत्या तुझ्या पाउलखुणा,
मनातं मात्र त्यांचा अभाव जाणावला,
कधिकाळी तुझी बेधुंद लाट,
आज तुझ्या वागण्यात मर्यादितपणा जाणावला,
कधितरी राज्यं करायचो शब्दांच्या जगावर,
तरी का आज आपल्या संभाशणात शब्दांचा अभाव जाणावला,
माझ्या हातातील तुझा हात जेव्हा तु सावधपणे सोडवला,
तेव्हाच आपल्या नात्यातिल पवित्रपणाचा पराभव जाणावला,
मैत्री आणि प्रेम नाण्याच्या दोन बाजु,
तरी प्रेमापुढे मैत्रिचा झालेला पराभव जाणावला….

गूगल ऐडवर्ड्स

 
Top