तु माझ्यासोबत चाललेली
ती चार पावलं मला आठवतात
तूझं हसणं, तूझं रूसणं,
मला तूझे स्पर्शही जाणवतात
मला अजूनसुद्धा आठवते तुझी-
-माझी वाट पहाणं
मला अजुनसुद्धा आठवतं
तुझं पावसात चिंब नहाणं
ते आंब्याच झाड, मला
आजसुध्दा खुणावतं
आजसुध्दा मन माझं
त्याच दिवसात हरवतं
तुलाही आठवत असेनच
ती रमलेली संध्याकाळ
तु मिठीत माझ्या शिरलेली
आणि बरसलेलं आभाळ
त्या चांदण्या, तो चंद्र,
ती रात्र, तो शहारा..
मी वेड्यासारखा वेचत रहातो
त्या आठवणींचा पसारा
ते दिवस मला आठवतात,
त्या आठवणी डोळ्यात साठतात
मी वाट देतो त्यांना
आणि अश्रु गालांवरून सांडतात...
ती चार पावलं मला आठवतात
तूझं हसणं, तूझं रूसणं,
मला तूझे स्पर्शही जाणवतात
मला अजूनसुद्धा आठवते तुझी-
-माझी वाट पहाणं
मला अजुनसुद्धा आठवतं
तुझं पावसात चिंब नहाणं
ते आंब्याच झाड, मला
आजसुध्दा खुणावतं
आजसुध्दा मन माझं
त्याच दिवसात हरवतं
तुलाही आठवत असेनच
ती रमलेली संध्याकाळ
तु मिठीत माझ्या शिरलेली
आणि बरसलेलं आभाळ
त्या चांदण्या, तो चंद्र,
ती रात्र, तो शहारा..
मी वेड्यासारखा वेचत रहातो
त्या आठवणींचा पसारा
ते दिवस मला आठवतात,
त्या आठवणी डोळ्यात साठतात
मी वाट देतो त्यांना
आणि अश्रु गालांवरून सांडतात...