ती आली लगबगीने माझ्याकडे...
धापा टाकत, श्वास रोखून बोलली...
माझं लग्न ठरलय...
रागावू नकोस, पण सार घाईतच घडलय...
लग्नाला नक्की ये... सांगून तिने निरोप घेतला धावता...
तिच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहण्यावाचून माझ्याकडे पर्यायच नव्हता...
ना शब्द ना संवेदना, ना चेहर्यावर हास्य...
कुठे कमी पडलो? काय चुकलं?...याच गणित जुळतच नव्हत...
अशी दुरावेल कधी ती स्वप्नात सुद्धा वाटल नव्हत...
मैत्रीच्या पुढे काही तिला कधीच का दिसल नव्हत...
तिच्या अश्या वागण्याच, उत्तर मला मिळतच नव्हत...
मी त्याच जागी उभा होतो पुतळ्यासारखा...
आतून आग भडकली होती, जळत होतो मेणासारखा...
तसतर तीच काही... काहीच नव्हत चुकल...
तिला कधी मनातलं सांगितल नाही इतकच मनाला खूपल...
आठवणीचा बांध हुंदके देत फुटला...आवरले नाही अश्रू त्यांनासुद्धा पूर आला
लख्ख प्रकाशाला घेरल काळोखानं... अंधाराच्या साम्राज्यात सुन्न कापरा सूर झाला...
तिला विसरण शक्य नाही...हास्यात तिच्या खास बात आहे
दुख कुणाला सांगू मनाचे.. अव्यक्त भावना हृदया आत आहे
सुख तीच महत्वाच...मनाची समजूत काढली अगदी मनापासून...
लग्नाला आवर्जून जायचं... मनाशी पक्क ठरवल अगदी या क्षणापासून...
तिला मनातल काही सांगू शकलो नाही ही खंत राहील नक्की मनात...
पण तू खूप छान दिसतेस्.... लग्नात हळूच सांगीन तिच्या कानात...