सुख पुरत नाही मला .

गेला रडत भक्त देवाकडे... बोलला...
हे एवढसं सुख पुरत नाही मला ...
दुखः मात्र तू सागरासम भरून दिले...

तो सुखात रंगलेला... हसून बोलला...
अरे खरतर दुखः मूठभर असत...
काही क्षणभर मुठीत राहत...
मूठ उघडली की जात ते निसटून... विरून...

सुख मात्र कायम असत...
मग ते किती छोटस का असे ना...
सागरसम येते भरती ओहोटी इतकाच काय तो फरक...

अशा या विराट रूपाने शेष नागावर स्वार समुद्राचा का आसरा घेतला...
भक्ताला त्या एका क्षणात समजल... नतमस्तक तो झाला या लीलेला...
Previous Post Next Post