Saturday, July 14, 2012

पुन्हा येईल पाउस.

आता पुन्हा येईल पाउस चिंब नव्या रूपाने ...

पावले पावसाची भिजलेली...
पुन्हा एकवार...
घेतील भेट तहानलेल्या धरतीची...

जाईल दरवळून पायवाट रानातली...
सुगंधाने तांबड्या मातीच्या...
करतील विहार थवे पाखरांचे आकाशी
पावसाच्या मुक्त बरसण्याने...

आता पुन्हा येईल पाउस चिंब नव्या रूपाने ...

येईल हवेत गारवा...
पुन्हा एकवार...
घेईल भेट व्याकूळ वार्‍याची...

हिरवीगार पान आता लागतील डोलू...
शांत बसलेला वारा सुद्धा लागेल बोलू...
खळखळ पाण्याची रानावनात गुणगुनेल
टिपटिप पावसाच्या गाण्याने...

आता पुन्हा येईल पाउस चिंब नव्या रूपाने ...

येईल आठवन बालपनाची
पुन्हा एकवार...
लागेल आस मना भिजण्याची....

रानभर सुटेल सुसाट धावत मन...
हरेक थेंब पावसाचा देइल नव्याची चाहुल...
दुख, एकांत, वेदना बंद डोळ्यांतून
जातील वाहून त्याच्या संगतीने...

आता पुन्हा येईल पाउस चिंब नव्या रूपाने ...
Reactions: