शेवटची इच्छा !अशाच एका सायंकाळी  तु मज भेटायासी येशील का?
आजही उभा त्या वाटेवरी तु एकदा तरी जाशील का?

वाट पाहतो त्या नदीतीरी वारा तु बनशील का?
वारा बनुनी हळूच येवूनी प्रेमाचे चार बोल बोलशील का?

किनारा बनलो सागराचा लाट तु होशील का?
काही क्षणांसाठी जरी असेल तरी वाहत येवूनी मिळशील का?

आतुर झालो चातकापरी तु वर्षा होशील का?
तुझ्या त्या एका थेम्बाने मज मोहात टाकशील का?

तडफडतो, मरतो  मीनपरी तु जीवन होशील का?
जीवनदान देवूनी माझ्या जीवनात जीवन तु होशील का?

मृत्यू मार्गी उभा  ठाकतो  आहे ...शेवटचे तरी येशील का?
माझ्या जळत्या त्या चितेसमोरदोन आश्रू तरी ढाळशील  का?

सांग ना गं!एवढी तरी शेवटची इच्छा माझी तु पुरी करशील का?
शेवटची इच्छा ! शेवटची इच्छा ! Reviewed by Hanumant Nalwade on July 05, 2012 Rating: 5
Powered by Blogger.