Thursday, July 5, 2012

कधी कधी कुठे तरी लांब.

कधी कधी कुठे तरी लांब जावस वाटत दूरवर कुठे तरी 
संध्याकाळच्या कुशीत जावून बसावस वाटत
मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणात न्हाहून,
थंड वाऱ्याच्या झुळूकेत मन थंड कराव वाटत,
सागराच्या लाटांशी पाठशिवणीचा खेळ,
आणि किनार्याच्या वाळूत पाय रोवून शांत
बसावस वाटत....
किनार्यावरून चालत जावून
मधेच मागे वळून पाहून
आपल्याच पायाच्या ठशांकडे पहावस वाटत...
सर्व काही विसरून 
एकांतात रहावस वाटत..
कधी कधी कुठे तरी लांब जावस वाटततरी
दूरवर कुठे तरी....
Reactions: