एक फसलेला डाव !





दुः ख  दाटुनी मनात आलं
पाणी पापण्यात तारलं
जिभेवर कडू साचलं
कळवळून हृदय रडलं

असा कोणता खेळ नशिबान मांडला
डावातील फास उलटाची पडला
जिंकण्याचा विचारच सुटला
जणू आयुष्याचा खेळच फसला

सरले नाही मनातले दुः ख
अश्रूंनी खारट सारे मुख
राईपरी भासते सुख
नको वावरी लावू असे मूक

न सहन होते आता ही समीक्षा
नशिबाने कोणती घेतली परीक्षा
मागतो तुझ्याकडे  भिक्षा
नको करी लावू एवढी प्रतीक्षा

पुन्हा नवीन डाव मांडण्याचा यत्न
जिंकण्यासाठी जणू मांडला यज्ञ
आहोरात्र सर्व लावले आहे पणास
आता फक्त जिंकणे हा एकच ध्यास.....
Previous Post Next Post