वाट पाहतोय,
वाट पाहतोय, तिच्या येण्याची...

येईल ती नकळत, उभी ठाकेल समोर एकाएक
घेईल हातात हात न विचारता
तिच्या स्पर्शाने शब्दही विरघळतील बर्फ होऊन...
कापरे बोल, अबोल मी... पाहीन तिच्याकडे
नजरही तिची बाणासारखी... सरळ काळजाला घाव देणारी...
मन पुटपुटतयं माझं जाणेल ती,
लगोलग ठेवेल तिचा हात माझ्या ओठी,
बिलगुणी मज बोलेल कानी,
भय, आवेश, काळजी, प्रश्न-उत्तर, सुख-दु:ख
सार सार विसर या घडीला...
जाणून घे जाणून घे,
अनंत, अनीवर, शाश्वत स्पर्श
ज्याची तुला, या घडीला नितांत गरज आहे...

म्हणून वाट पाहतोय,
वाट पाहतोय, तिच्या येण्याची...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top