घरात भासते एकटेपण
मनाच्या आत दाटे अनेक क्षण
विरहाच्या ह्या खेळामध्ये
जणू सारेच करतायेत साजरे सण

मीच माझ्या मनाला कसे बसे सावरतोय
दारामध्ये बसून फक्त तिचीच वाट पाहतोय

ऑफिसमध्ये सारेच व्यस्त
कामामुळे मनही अस्वस्त
क्षण सारे तिचे आठवता
मज जीवन वाटे खूपच त्रस्त

स्वतःची अवस्था पाहून स्वतःवरच हसतोय
दारामध्ये बसून फक्त तिचीच वाट पाहतोय

मित्रांशी हितगुज करता
प्रेमाचा अर्थ कळला
विरहातही छान प्रेम असतं
त्या प्रेमाचा अर्थ समजला

आज तिची वाट पाहतांना मला वेगळाच आनंद मिळतोय
दारामध्ये बसून फक्त तिचीच वाट पाहतोय

गूगल ऐडवर्ड्स

 
Top