Thursday, July 5, 2012

प्रेमाचा दिवा !


तुला पाहिलं त्या दिसी सूर्योदय जाहला
अंधाऱ्या या आयुष्यात तुझा प्रकाश पडला

पहिल्यांदाच आयुष्यात असा काही चमत्कार घडला
काही कळायच्या आताच प्रेमाचा रोग जडला 

क्षणभरही   दुरावा मला  सहन नाही झाला
सांगू कसं तुजला की कसा तुझ्याविन काळ हा सरला

सांगून टाकायचा मनात विचार पक्का केला 
मात्र तुझ्या नकाराच्या शंकेचा साप नेहमी डसला

दिवसरात्र स्वप्नात तुझाच चेहरा दिसला
तुझ्या स्वप्नातच मी हा जन्म जगला

शेवटी न राहवून तुला सांगण्याचा प्रयत्न केला
पण त्या आधीच तुझ्या लग्नाचा दिवस उजाडला

तुझ्या प्रेमाचा दिवा मनात तसाच तेवत राहिला
माझ्या मात्र आयुष्यात पुन्हा काळोखच माजला.
Reactions: