हाक.

या किनाऱ्यावर मी अन दुसऱ्या किनाऱ्यावर उभी ती...
तरी माझी हाक तिच्या कानी पोहोचली...
माझ्या मनातली ओढ आणि वाऱ्याचा जोर यामुळेच कि काय...
वीज कडाडून आकाशात गरजली...

तीने लगोलग लाटेसोबत उत्तर धाडले
आणि मला मनसोक्त भिजवून टाकले...

उत्तर नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी
मी नावेचा आधार घेतला...

खवळलेला समुद्र, उधाणलेल्या लाटा
कडाडणारी वीज, घोंघवनारा वारा
भिजवणारा पाऊस अन् बरसणार्‍या गारा...

न जुमानता विरोधाला...गाठला दुसरा मी किनारा....

गाठल्यावर किनारा... चारीदिशाना पाहिलं...
ती कुठेच दिसली नाही...
विचार केला बहुदा ती सुद्धा माझ्या ओढीने
दुसऱ्या किनाऱ्यावर तर नसेल गेली?...

पुन्हा तिला आर्त आवाज दिला...
वारा पुन्हा लगेचच तिचे उत्तर घेऊन आला...
मला वेड्यात काढून कानात घोंघावत म्हणाला...
अरे इकडे तिकडे शोधतोस काय...
ती आहे तुझ्यात... तुझ्या अंतरात...
अरे वेड्या तुझ्याच मनात...
Previous Post Next Post