सारे शब्दांचे गाठोडे... रिते केले मी नभात...
तुझे नाव सजले तेव्हा... हर एक चांदण्यात...
तुझे वेध चांदण्याना... आता लागले लागले...
तुझ्या मनाचे अंगण... त्यांना भावले भावले...
चांदण्यांचा वेडेपणा... असा प्राजक्त जाणतो ...
तुझ्या घरापाशी उभा... तोही सांडतो सांडतो...
तुझ्या स्पर्शाला भुलून... कळी उमलली आज...
लाजाळुला लाव हात... त्यांनी सोडलीया लाज...
तुझ्या पावलांचे ठसे... माती ठेवते जपून...
वारा हलकेच येतो... जातो मातीत मिळून...
वारा तुफान सुटतो... तुझ्या भोवती फिरतो...
भर उन्हात बेभान... रोमरोमी शहारतो...
ओथंबले शब्द आज... तुझे होऊन थिजले..
निसटले हातातून... तुझ्या रूपात भिजले...
निसटले हातातून... तुझ्या रूपात भिजले...