तू गुणगुणतेस ते गाणं आज माझ्या ओठी आलं
तेव्हा आठवलं हे गाणं आवडायचं मला कधी काळी...
तू चेष्टा करत विचारलस...
त्यात नवल ते काय?...
मी म्हटलं...
तेव्हा ते फक्त आवडायचं...पण आज अर्थ नवा आला...
त्या गाण्यातला हरेक शब्द आज फक्त तुझाच झाला...
तुला माहित आहे का हे गाण पुन्हा ओठांवर का आलं?...
कारण...
तुझ्या येण्यानं ते गाणं जिवंत आज झालं...
ती फक्त पाहत राहिली माझ्याकड़े... गाण्यात हरवून....
पुन्हा ना कधी तिने चेष्टा केली...
ना प्रश्न केला...
जगतेय आता ती... माझीच होऊन...
जगतेय आता ती... माझे जीवन गाणं होऊन....