ती म्हणते...
पाऊस बरसताना तू माझ्यासोबत असावं...
पावसात तू अन् तुझ्यात मी नखशीकांत भिजावं...
ओल्याचिंब झाडाखाली नदीकडे पाहत बसायचं...
कधी तू कधी मी... एकमेकांच्या कुशीत शिरायचं...
मिठीचा आसरा द्यायचा देहाला...
ओठवर ओठ टेकवताचं पावसान धोधो बरसावं...
पावसात तू अन् तुझ्यात मी नखशीकांत भिजावं...
लाजून चेहेऱ्यावर ओढलेला पदर... तू हळूच बाजूला सारावा...
ओलावलेल्या बाहूंवरचा थेंब अलगद... ओठांनी तू टिपावा...
दूर जाण्याचा मी प्रयत्न करीन...
तू मात्र हात पकडून मला... जवळ अगदी जवळ ओढावं...
अन् अशा वेळी,
माझा नकार होकार होण्यासाठी... विजेने जोरात गर्जावं...
ती म्हणते...
पावसात तू अन् तुझ्यात मी नखशीकांत भिजावं..