माझिया प्रियाला प्रीत कळेना..........
असाव कुणीतरी...... आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार..
असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार..
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार..
असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार..
असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..
असाव कुणीतरी......
खूप काही विचारणार..
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार..
असाव कुणीतरी....
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं...
ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं..
बसून ह्दयात मग शांतपणे निजावं..
हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं..
मग त्याच्याच समजूतीने क्शनभर विसावं.
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं..
वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं..
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं...
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं..
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं..
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं..
वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं..
क्षणभर का होइना स्वतःला विसरुन बघावं.
वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं.
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं.