शब्दात जे, मी न बोलू शकलो,
आज ते तुझी नझर बोलून गेली ..
माझ्याच नकळत, माझ्या मनातलं सार,
आज ती माझ्याच समोर मांडून गेली...
मी फक्त पाहतच बसलो,
तुझ्या त्या बोलक्या नझरांना...
अन पाहता पाहता,
कळलच नाही कधी, तू माझी होऊन गेलीस....
निळ्या त्या नयनात तुझ्या,
मला सारा आसमंत, आज तू दाखवून गेलीस...
मला सारा आसमंत...
आज...
... तू दाखवून गेलीस...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top