विसरलोय मी... तिची न माझी झालेली पहिली भेट
विसरलोय मी... जी मनात बसली होती एकदम थेट

विसरलोय मी.... तिने त्या दिवशी घातलेला अबोली कलरचा ड्रेस
विसरलोय मी.... तेव्हाचे तिचे वार्यावर उडणारे काळे केस

विसरलोय मी.... सरळ मनावर वार करणारा तिचा एक कटाक्ष
विसरलोय मी.... तेव्हाची रिमझिम पावसाची साक्ष

विसरलोय मी.... तिच चिडून मला खडूस म्हणन
विसरलोय मी.... लटक्या रागात सुद्धा प्रेमान काळजी घेण

विसरलोय मी.... दोघांनी घेतलेला वाफाळलेला चहाचा कप
विसरलोय मी.... तिने दिलेलं चाफ्याचं रोप

विसरलोय मी.... मला सतवण्यासाठी तिच मुद्दाम अबोल राहण
विसरलोय मी.... मला बोलता बोलता निशब्द करण

विसरलोय मी.... आमच्यात भांडणाच, मैत्रीच, आणि .....प्रेमाचं बोलण झालेलं
.
.
.
आणि
विसरलोय मी....तिने मला"मला विसर"म्हटलेलं....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top