Wednesday, July 4, 2012

तेव्हाच कळते.

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जाते,
प्रश्न कधी कधी कळत नाहीत आणि उत्तर चुकत जाते,
सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता,
पण प्रत्येक वेळी नवनवीन गाठ बनत जाते,
दाखविनाऱ्याला वाट माहित नसते,
चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते,
दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी,
"अनुभव" म्हणजे काय हे तेव्हाच कळते.
Reactions: