आजही आठवतेय मला.

आजही आठवतेय मला..कुठे नाहीशी व्हायची.



आजही आठवतो मला,तुझ्या तो पापण्या झुकवून,
केलेला गुलाबी सलाम..

दुरून अशी येताना, पदर सावरूनी तू,
केलेस त्या वार्‍याला गुलाम..

आजही आठवते मला, तुझ्या शहारलेल्या देहाची,
अलवार अशी थरथर..

मिठीत विरघळता माझ्या, मिटून घ्यायची किनार पापणी,
तेव्हा पडायचा जगाचाच विसर..

आजही आठवतेय मला, तुझ्या केसात माळलेली फुले,
शुभ्र सुगंधी मोगर्‍याची..
 
गळून पडायची ती ही अलगद, गुलाबी धुंदीत आपल्या,
अन काय तू लाजायची...

आजही आठवतेय मला, ती सांज खूळी यायची,
घेवून परतीची वेळ बोचरी..
निघायचीस तू जड पावलांनी, सोडून अर्धवट ती शृंखला स्पर्शाची,
दाखवून स्वप्ने सुखाची हजार,

क्षितीजाआड कुठे नाहीशी व्हायची.
Previous Post Next Post