Sunday, June 3, 2012

कविता - माझी मैत्रीण..

कविता - माझी मैत्रीण..

तू नव्हतीस तेव्हा,
कविताच माझी मैत्रीण होती,
रक्ताच नव्हतं नात कोणतं,
तरीही माझ्या रक्तात ती वाहत होती..

तू आलीस अन शब्दांना,
परीसाचा स्पर्श लाभला,
तुझ्यावर लिहिताना गजल,
भावनांना नवा हर्ष लाभला..

तुझ्यावर लिहित गेलो,
अन तुझ्या प्रेमात पडलो,
तुझ्या काळजाचा विश्वात,
स्वत:लाच विसरून गेलो...

रोज शब्दातून तुला भेटयचो,
ओठातलं सारं काही नेहमी,
माझ्या कवितेतून थेट तुझ्या,
मनालाच सांगत रहायचो..

जेव्हा मला वाटलं होतं,
कि तुला डोळे भरून पहावं,
पण शब्दात जगणारा मी,
मुखवट्यातूनच आपलं जगणं असावं..

कविता - माझी मैत्रीण..


Reactions: