Sunday, June 3, 2012

माझ्याशी लग्न करशील

माझ्याशी लग्न करशील?

ओढ अनाम श्वासांची, अन क्षणाचा हा दुरावा,
सांग का आता आपण,  सहन करत रहावा
तु माझ्यासाठी अन मी फक्त तुझ्याचसाठी
असे असतानाही  का करतो चोरून भेटी गाठी
का आता मिठिसाठी, हवाय झाडामागचा अडोसा,
हातात हात धरण्यासाठी कशाला हवाय कोणाचा भरोसा..
विश्वास आता कायम आहे आपल्या दोघांच्याही श्वासात,
मग कशाला जगायचे आपण क्षणात विरणार्‍या गुलाबी आभासात..
आता हवीये तू मला माझ्या या सहजिवनात,
मळवट कपाळी भरूनी, जोडवी घाल तुझ्या पायात
धागा आयुष्याचा बांधीन, मी तुझ्या गोड गुलाबी गळ्यात, 
अन होईल मी एकरूप तुझ्याशी, मधूचंद्र चांदण्याच्या खळ्यात..

Reactions: