Sunday, June 3, 2012

नाही कळले प्रेम तुला.

नाही कळले प्रेम तुला,
    मी शब्दांतून मांडलेले.
भावनांचे ते विलक्षण मोती,
    माझ्या हृदयातून सांडलेले.


मनातल्या भावना परखडपणे,
    मी सुध्दा चारोळीतून व्यक्त करतो.
पहिल्या दोन ओळी पटकन होतात,
    उरलेल्या दोघींसाठी खटाटोप पुरतो.


ही चारोळी नाही माझ्या आयष्याची होळी आहे…,
फक्त एकवेळ समजून घे मला भले नंतर माझं नशीब माझ्यावर रुसावं….


तुझ्यासाठीच जगणं आणि तुझ्यासाठीच मरणं,
     हे तर माझं फक्त एक काव्य आहे….
खर म्हटलं तर, तुझ्या प्रेमासाठीच मला,
    मरणानंतरही जगायचं आहे


माणूस हा तर,
      मुळातच समाजशील प्राणी आहे.
प्रत्येक माणसाच्या हृदयाला,
     हर एक नात्याची आस आहे
Reactions: