Monday, June 4, 2012

फक्त माझी कविता सोबत आहे.

फक्त ती सोबत आहे....

"फक्त ती सोबत आहे....
नकळत माझ आयुष्य एकेरी पानावर मांडायला,
आणि मी एकटा आहे म्हणून छळणाऱ्या त्या प्रत्येकाशी भांडायला.
फक्त ती सोबत आहे....
पडुन पुन्हा उभ रहणाऱ्या माझ्याकड़े नविन आशेने बघायला,
आणि सुखात खुप खुप हसुन दुखात माझ्या डोळ्यानी खार पाणी रडायला.
फक्त ती सोबत आहे....
रागावलेल्या मला छेडून माझ्यावरती हसायला,
आणि कायम रस्ता चुकणाऱ्या माझ्यावर ओरडून खेटून गाल फुगवून बसायला.
फक्त ती सोबत आहे....
मी बदलायला हव म्हणून मुद्दाम माझ्यासारख वागायला,
आणि रुतनाऱ्या काट्यासारख माझ आयुष्य पाकळीसारख खोट खोट प्रत्येक क्षणी जगायला.
फक्त ती सोबत आहे....
अडखळणार माझ प्रत्येक पाउल हात घट्ट धरून सावरायला,
आणि भरकटणार अक्षयच मन शब्दांचा चाबुक मारून आवरायला.
हो खरच....
फक्त माझी कविता सोबत आहे...."
Reactions: