असा कोणी असेल का ?

असा कोणी असेल का? आयुष्याच्या नवीन वळणावर, माझा हाथ विश्वासाने पकडणारा, असा कोणी असेल का?
जीवनाच्या काटेरी रस्त्यावर, प्रेमाचे फुल पडणारा असा कोणी असेल का? पावसात भिजताना , पावसातून माझे अश्रू ओळखणारा असा कोणी असेल का? माझ्या डोळ्यात पाहून , माझे अन्तः करण ओळखणारा असा कोणी असेल का? माझ्यातली मी शोधून देणारा, आणि माझ विश्व होणारा, असा कोणी असेल का ? कळत नकळत झालेली माझी चूक, हक्काने सांगून ती सुध्रावणारा असा कोणी असेल का ? मी रडत असताना , स्वतः चा खांदा भिजवणारा असा कोणी असेल का? आणि आणि मला माझ्या ह्या स्वप्नातून उठवणारा , असा कोणी असेल का ?.
Previous Post Next Post