साथ देशील ना मला .

काल तू म्हणालीस तू खूप आवडतोस
जेव्हा तू माझीच गाणी बडबडतोस
सांग ना प्रिये खरच साथ देशील ना मला

मलाही खरेच आवडतेस तू
कसे सांगू आज तुला
शब्दच मला मिळत नाहीत

प्रेमात आपल्या मी तुला देईल एक आशा
करत राहील मी प्रेम
न देणार खोटी अमिषा
भरवसा तुझा हीच माझी दौलत आहे

फक्त तू साथ दे मला
आयुष्यभर आठवण राहील
एवढे प्रेम देईल मी तुला..

काल तू म्हणालीस तू खूप आवडतोस

सांग ना प्रिये खरच साथ देशील ना मला
आज असे काय झाले तुला
तू निघून जा म्हणते आहेस मला
एवढा विश्वास खरेच नाही तुला
कदाचित माझेच प्रेम अधुरे वाटले तुला ..

आपले प्रेम होईल पूर्ण होईल नक्की
तू साथ दे मला
माहित आहे तू आजही त्या झाडावरच प्रेम अधिक करतेस
ज्या सावली मध्ये तू राहिलीस
पण एकदा ये जवळ मी ही
प्रेमाची बाहुली बनून ठेवेल तुला
फुलांच्या छायेत ठेवेल तुला ..

काल तू म्हणालीस तू खूप आवडतोस
सांग ना प्रिये खरच साथ देशील ना मला ..
साथ देशील ना मला . साथ देशील ना मला . Reviewed by Hanumant Nalwade on June 09, 2012 Rating: 5
Powered by Blogger.