वेदना बोलु लागल्या तर त्या हजार जिभांनी ओरडतील
प्रत्येक वेदना दुसर्‍या वेदनेचा  आक्रोश खोडुन काढतील


मीच श्रेष्ठ असं म्हणत... वेदना-वेदनांमध्ये चुरस लागेल
प्रत्येक वेदना दुसर्‍या वेदनेकडं  मग तुच्छतेनं बघेल


मनात, तनात, घरात, दारात फ़क्त वेदना दिसु लागतील
काहीच उरणार नाही कुठं सर्वत्र फ़क्त वेदनाच भासु लागतील

पण...
पण वेदना बोलायला लागल्या तर ऐकायला कुणीच उरणार नाही
कदाचित म्हणुनच सार्‍या वेदना मौन पांघरुन शांत निजल्या आहेत..प्रत्येकात...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top