मी फक्त एवढेच मिळवले

तू असशील तुझ्या जगात सुःखी,
इथे तुझ्या नावाचे श्वास घेतो मी..
ओंजळीत समेटून अश्रू सारे,
तुलाचं त्याचे अर्थ देतो मी..
तुला कळेलचं, उशिरा का होईना,
माझं प्रेम नव्हतं इतकं व्यवहारी..
दिल्या-घेतल्याचा हिशोब ठेवलास,
पण तू राहशील प्रेमाशिवाय भिकारी..
कधी कधी उगाचं वाटतं मला,
काय पाहिलं होतं मी तुझ्यात..
तुझ्या-माझ्या नात्याचं भविष्य,
तेव्हापासूनचं होतं तळ्यात-मळ्यात..
इतकं सारं सोसून, पाहूनही,
मी माझ्या नशिबावर थक्क आहे..
दारं उघडी ठेवलीत मी हृदयाची,
पुन्हा प्रेमात पडण्याचा मलाही हक्क आहे.


'युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असत'

 प्रेम करून मी फक्त एवढेच मिळवले.
मी फक्त एवढेच मिळवले मी फक्त एवढेच मिळवले Reviewed by Hanumant Nalwade on May 18, 2012 Rating: 5
Powered by Blogger.