एक ७ वर्षाच्या मुलाची आई मरते..! वडील दूसर लग्न करतात...


एक दिवस वडिल आपल्या मुलाला विचारतात कि 

बेटा,  तुला तुझ्या जुन्या आईत आणि नविन आईत काय फरक जाणवला..?

मुलगा बोलला : माझी नवी आई खरी आहे आणि जुनी आई खोटी होती..!!
हे ऐकुन वडिलांना आश्चर्य वाटलं, त्यांनी परत विचारलं : का तुला असं का वाटलं बेटा..?
जिने तुला जन्म दिला ती खोटी आणि काल परवा आलेली नवी आई खरी कशी..?

मुलगा बोलला : जेव्हा मी मस्ती करायचो तेव्हा माझी जुनी आई बोलायची कि
 "जर तु अशीच मस्ती करत राहिलास तर तुला जेवण मिळणार नाही"तरी मी
खुप मस्ती करत रहायचो आणि ती मला पुर्ण गावातुन शोधुन घरी आणायची आणि
अपल्या जवळ बसवुन जेऊ घालायची..!!
आणि 
ही नवी आई बोलते कि "जर तु मस्ती करत राहिलास तर तुला जेवण नाही देणार.... 
आणि खरच तिने मला आज तीन दिवस झाले जेवण नाही दिले...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top