भिरभिर डोळ्यांनी माझी वाट बघणारी
"किती रे उशीर ..?" असं म्हणून भांडणारी"मी वेळेवर आलोय तूच
आधी येऊन बसलीस" असं बोलल्यावर हळूच "सॉरी" बोलून जीभ चावणारी ....
अशीच आहे ती .......पावसात चालताना वीज कडाडल्यावर घाबरून मला बिलगणारी
अन दुस-याच क्षणी लाजून दूर होणारी... "अरे भिजू नकोस आजारी पडशील"
असं मला सांगून स्वत:च भिजणारी ...अशीच आहे ती ....मी गर्दीत दिसेनासा झाल्यावर
कावरीबावरी होऊन मला शोधणारी"हात का सोडलास रे..?हरवला असतास तर ..?"

गूगल ऐडवर्ड्स

 
Top