कविता करायला लागतात

प्रेमात पडलं की सारेच जण  कविता करायला लागतातखरं सांगायचं तर थोडसं  वेड्यासारखंच वागतात.
यात काही चुकीचं नाही  सहाजिकच असतं सारं एकदा प्रेमात पडलं की  उघडू लागतात मनाची दारं
मनातल्या भावना अलगद मग  कागदावरती उतरतात डोळ्यांमधील आसवंसुद्धा  शब्द होऊन पसरतात
रात्रंदिवस तिचेच विचार  आपल्याला मग छ्ळू लागतात न उमजलेल्या बरयाच गोष्टी  तेव्हा मात्र कळू लागतात.
Photo
डोळ्याशी डोळा लागत नाही  एकाकी रात्री खायला उठतात ओठांपाशी थांबलेले शब्द कवितेमधून बाहेर फुटतात
गोड गोड स्वप्नं बघत मग रात्र रात्र जागतात प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात.
निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही  प्रेमात निरनिराळे अर्थ असतात गणित, भूगोल, व्याकरण सारी इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात
अंगात फाटकी बनियन असली तरी इस्त्रीचा शर्ट घालतात जग जिंकल्याच्या तोरयात छाती फुगवून ऎटीत चालतात
सभोवताली काय चाललंय कशाचच नसतं भान चालता बोलता तिचाच विचार'तिचं हसणं किती छान?'
ठाणे, बोरिवलीच्या पुढे एकदाही आपण गेलेलो नसतो तरी तिच्यासाठी चंद्र-तारे तोडून आणायला तयार असतो...!!!
कविता करायला लागतात कविता करायला लागतात Reviewed by Hanumant Nalwade on December 08, 2013 Rating: 5
Powered by Blogger.