एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी लपा- छपी खेळायचे ठरवले वेड्यावर राज्य होत, तो १,२,३ ...असे आकडे म्हणू . लागला, इकडे प्रेम लपण्यासाठी जागा बघत होत, पण प्रेमाला प्रेमाची जागाच मिळत नव्हती, वेड्याचे आकडे जेव्हा संपत आले तेव्हा प्रेमाने पटकन समोरच्या झुडपात उडी टाकली, ते झुडूप गुलाबांच्या फुलांच होत आणि तेथे प्रेम लपून बसलं ............. वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं,पण प्रेम काही मिळाले नाही,
शेवटी स्वताहाची हार सहन न झाल्या मुळे वेड्याने चिडून समोरच्या झुड्प्यात जोराने काठी खुपसली व बाहेर काढली ........बाहेर काढल्या नंतर काठीला लागलेलं रक्त बघून वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये वाकून बघितलं,
तेव्हा तिथे त्याला हसत असलेल प्रेम दिसलं, पण तो पर्यंत ते प्रेम आंधळ झाल होत कारण ती काठी त्या प्रेमाच्या डोळ्यात खुपसली गेली होती ..........ते पाहून वेड खूप रडला आणि त्याने प्रेमाला वचन दिले कि इथून पुढे तू माझ्या डोळ्यांनी बघशील म्हणजेच मी नेहमी तुझ्या आधारासाठी तुझ्या बरोबर राहीन ...............तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे आणि प्रत्येक जण प्रेमात वेडा..