Wednesday, July 31, 2013

ती सुखात राहायला हवी

त्याने मला विचारलं की खरच आवडते ती तुला? जेव्हा तू एकटाच असतो वेड लावते का जिवाला ?
मीहलकेच हसलोतेव्हा अन् उत्तर दिलं मी त्याला अरे, माझा प्रत्येक श्वास तिच्यासाठी आसुसलेला
अरे मग तू विचार ना तिला त्याने अनाहूत सल्ला दीला कावाट पाहतो रे तू संधीची करुनच टाक एकदा फैसला
थोडासा हळवा झालो तेव्हा आवाजहीथोडा ओला झाला म्हटलं, अस नसतं रे मित्रा इथे जीव तिच्यात गुंतलेला
अगदी असंच काही नाही मित्रा कीतीमाझी सखी व्हायला हवी जगाच्या पाठीवर कुठेही राहो फक्त ती सुखात राहायला हवी......!!!
Reactions: